December 2, 2024 5:38 pm Total Views: 2320
महायुतीमध्ये कुठलेही मतभेद नाही एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर गिरीश महाजन यांचे वक्तव्य.
यहाँ क्लिक करके हमारे व्हाट्सएप ग्रुप को ज्वाइन करेंकाळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साताऱ्याहून आल्यापासून प्रकृतीच्या कारणास्तव सर्व कार्यक्रम रद्द केले होते. त्यामुळे महायुतीत मतभेद असल्याच्या चर्चेला उधाण आले होते.
Read Also This:
आज संध्याकाळी गिरीश महाजन यांनी एकनाथ शिंदे यांची ठाण्यातील त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. सुमारे तासाभराच्या चर्चे नंतर गिरीश महाजन यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले की, एकनाथ शिंदे यांच्या तब्येतीचे विचारपूस करण्यासाठी आलो होतो. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सव्वा तास चर्चा झाली. महायुतीमध्ये मतभेद असल्याची अफवा पसरवली जात होती परंतु आमच्या मध्ये कुठलेही मतभेद नाहीत. एकनाथ शिंदे यांचे प्रामाणिक आणि स्पष्ट मत आहे महायुती संदर्भात. देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे नाराजी असण्यासारखा कुठला विषयच नाही.
खाते वाटपावर बोलताना महाराजांनी सांगितले की महायुतीचे नेते चर्चा करतील आणि वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्यात येईल. तसेच उद्यापासून आम्ही सगळे मिळून काम करू आणि महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करू. एकनाथ शिंदे सुद्धा उद्या पासून बैठकीला येतील आणि महायुतीच्या सर्व नेत्यांच्या उपस्थितीत शपथविधी समारोह पाच तारखेलाच होईल.