December 3, 2024 1:12 pm Total Views: 2314
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी गावातील ग्रामस्थांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला होता. तसेच त्यांनी आज (३ डिंसेंबर) पुन्हा एकदा मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पोलीस प्रशासनाने हस्तक्षेप केल्यानंतर गावकऱ्यांनी हा मतदानाचा निर्णय मागे घेतला. पण एकवेळी गावकऱ्यांनी काहीही झाले तरी मतपत्रिकेवर मतदान घेणार अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर प्रशासनाने गावात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
यहाँ क्लिक करके हमारे व्हाट्सएप ग्रुप को ज्वाइन करेंमाळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकरवाडीमध्ये प्रशासनाकडून निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निर्दोष रितीनेच पूर्ण झाल्याचे स्पष्टीकरण निवडणूक निर्णय अधिकारी विजया भांगळालकर यांनी दिले.
Read Also This:
स्पष्टीकरणात काय म्हटले आहे
मारकरवाडी येथे मतदान केंद्र क्र. ९६, ९७ आणि ९८ अशी तीन केंद्र येतात, या तीनही मतदान केंद्रांवर प्रत्यक्ष मतदान आणि मतमोजणीच्या प्रक्रियेत कोणतीही विसंगती आढळलेली नाही. मतदानाच्या दिवशी प्रत्येक केंद्रावर उमेदवारांचे ‘पोलिंग एजंट उपस्थित होते आणि त्यांच्याकडून कोणतीही तक्रार आलेली नाही, त्याचप्रमाणे मतमोजणीच्या वेळी देखील उमेदवारांचे काउंटिंग एजंट उपस्थित होते. त्यांच्याकडूनही मतमोजणी दरम्यान किंवा नंतरही कोणताही आक्षेप नोंदवण्यात आलेला नाही. तसेच फेरमतमोजणीची कोणतीही मागणी झाली नाही. निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया नियमानुसार पारदर्शकपणे पार पडल्यानंतरच निकाल घोषित झाला आहे.
निवडणुकीशी संबंधित प्रत्येक टप्प्यावर उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधींना सहभागासाठी नियमानुसार वेळोवेळी कळवले गेले होते. यानुसार उमेदवारांचे प्रतिनिधि निवडणूक प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर सहभागीसुद्धा झाले होते. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार निवडणुकीपूर्वी आणि मतदानाच्या दिवशी मतदानापूर्वी चाचणी मतदानही घेतले गेले, मतदानयंत्राच्या फर्स्ट लेवल चेक (FLC) आणि कामिशनिंग ह्या टप्प्यावर राजकीय पक्ष आणि उमेदवाराच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत चाचणी मतदान घेतले आहे. मतदानाच्या दिवशी प्रत्येक मतदान यंत्रावर ५० मतांची चाचणी घेतली गेली. या कोणत्याही टप्प्यावर संबंधितांकडून कोणत्याही तक्रारी वा आक्षेप नोंदवले गेलेले नाहीत. प्रशासनाने निवडणूक आयोगाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करून प्रक्रिया पूर्ण केली आहे. एकंदर मतदान, मतमोजणी आणि निकाल प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा विसंगती आढळली नसल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती विजया भांगळालकर यांनी कळविले आहे.
https://x.com/CEO_Maharashtra/status/1863870864779055452
विधानसभा निवडणुकीत मारकडवाडी या गावातून भाजपाचे माजी आमदार राम सातपुते यांना अधिकची मते मिळाली, असा आरोप निकालानंतर करण्यात येत आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी ईव्हीएमवर संशय घेत, पुन्हा एकदा मतदान घेण्याची मागणी केली होती. मात्र प्रशासनाने याला विरोध करून गावात मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले होते.