
December 11, 2024 8:39 am Total Views: 4218
चौपाटी भोर येथे श्री दत्त जयंती सप्ताहाचे आयोजन
यहाँ क्लिक करके हमारे व्हाट्सएप ग्रुप को ज्वाइन करेंरवि सोहम् दत्त फाऊंडेशनच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
Read Also This:

Prakash Argade
भोर : दि. १० दिसें – वैराग्यमूर्ती सदाशिव देशमुख महाराज, रवि सोहम् दत्त फाऊंडेशनच्या वतीने भोर येथील चौपाटी येथे श्री दत्त जयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. समाजात अध्यात्मिक तसेच सामाजिक बांधिलकीची जाणीव रहावी असे कार्य करत आज ५९ वर्ष पूर्ण होत आहेत.
श्री दत्त जयंती सोहळ्याचे नियोजन खालील प्रमाणे असेल !
- बुधवार, (दि. ११) सकाळी ११ वाजता भाविक भक्त ग्रंथराज गुरुचरित्र पारायण संकल्प घेऊन ३ दिवस पारायणा बसतील या दरम्यान रोज सकाळी १० वाजता महाआरती, सायं. ६ वाजता हरिपाठ, रात्री ७ वाजता महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच रात्री ९ वा. भक्तीमय भजनाचा कार्यक्रम होईल. शुक्रवारी (दि.१३) दुपारी ३ वाजता पारायणाची सांगता व समाप्ती करून भोरग्रामी माधुकरी (भिक्षे) साठी प्रस्थान केले जाईल.
- शनिवारी (दि. १४) सकाळी ९.३० वा. सातारातील प्रसिद्ध महेश जंगम (राजूस्वामी) व त्यांचे शिष्य यांच्या पौरोहित्याखाली दत्तयाग महायज्ञ, होम-हवन, रुद्राभिषेक, पुण्यहवाचन, कलशपूजन व आरती केली जाईल.
- दुपारी ३ वाजता गुरुपूजन व ‘श्री दत्त’ नामाचा नामस्मरण सोहळा.
दु.४ वाजा श्री दत्तगुरु जन्मोत्सवाचे कीर्तन भागवताचार्य ह.भ.प. राजेंद्र महाराज शास्त्री - सायं. ७.१५ वा. श्री दत्तजन्मोत्सव, आरती व सुंठवडा प्रसाद वाटप केले जाईल.
- तसेच अध्द्यातिक कार्या सोबत सामाजिक बांधिलकी जपत शनिवारी (दि. १४) रोजी सकाळी १० ते ५ भव्य रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
- रविवार (दि. १५) सकाळी ९.०० वा. दही-काल्याचे कीर्तन ह.भ.प. दत्तात्रय महाराज गिरे यांच्या हस्ते होईल सोबत भजन आणि गोपाळकाला सुद्धा होईल.
- दुपारी १२.३० वा. आरती झाल्यावर महाप्रसादाला सुरुवात होईल.
वैराग्यमूर्ती सदाशिव देशमुख महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सदर सोहळ्याला रवि सोहम् दत्त फाऊंडेशन व दत्त सेवेकरी तसेच रवि सोहम दत्त क्रीडा संघ, जवाहर तरुण मंडळ, रोहीडा शिवजयंती उत्सव समिती, रुद्र मराठा दुर्ग भ्रमण संघ महाराष्ट्र, आपत्ती व्यवस्थापन संघ महाराष्ट्र, सह्याद्री सर्च ऍण्ड रेस्क्यु फोर्स, पुणे यांचे सहकार्य लाभले आहे.